थोरल्या-धाकल्या धन्याची बदनामी करणार्‍यांना आवरा : सुरवसे पाटील   

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य कोणा एका धर्माचे किंवा जातीचे नव्हते. ते रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराजांच्या मावळ्यात सर्व जाती, धर्माचे लोक होते. त्यामुळे थोरल्या आणि धाकल्या धन्याची बदनामी करणार्‍यांना वेळीच आवर घातला पाहिजे मत युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केले.
  
सुरवसे पाटील म्हणाले की, पुढच्या पिढीला इतिहास सांगायचा असेल, तर दोन्ही बाजू सांगाव्या लागतील. उगाच जाती-धर्माच्या नावाने समाजामध्ये दुही पेरण्याचे काम कोणी करू नये. कपटी आणि स्वराज्यविरोधी स्वकीयांची त्यांनी तमा बाळगली नाही. तसेच मृत्यूनंतर वैर संपते. अशी शिकवणही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्तनातून दिली. पूर्वजन्मीचे कोण होते ते आता आले असे सांगण्याचा कोणी आगाऊपणा करण्याचे कारण नाही. इतिहास झाकला जाणार नाही, पुसला जाणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. तोपर्यंत चंद्र-सूर्य असणार आहे. इतिहासात छेडछाड केली, तर कर्तृत्ववान राजे, महाराजांचा पराक्रम जसा झाकोळला जातो. काही व्यक्तिमत्त्वे अन्यायकारक होती. त्यांनी प्रजेचा छळ केला, हे  वास्तवाने समोर आल्याशिवाय त्यांचा वध का केला. हे पुढे येत नाही. 
 
अन्यायी राजांनाच या भूमीत गाडले, इथे त्याची कबर आहे, हा  इतिहास पुढच्या पिढ्यांना कळला पाहिजे. अन्यायकारक राजांच्या कबरी फोडण्याची भाषा करून आपल्या राजांचा इतिहास आपण पुसतो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीपासून दूर जातो आहोत, याचे भान ठेवायला हवे. ते भान नसल्याने केलेल्या वक्तव्यातून नागपूरसारख्या दंगली उसळतात. त्यामुळे थोरल्या-धाकल्या धन्याची बदनामी करणार्‍यांना आता आवर घालण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Articles